GRAMIN SEARCH BANNER

सिंधुदुर्ग व कणकवली स्थानकांवर अखेर दोन एक्स्प्रेसना थांबे

Gramin Varta
102 Views

खेड ः कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी प्रतीक्षेत असलेली आनंदाची बातमी आता समोर आली आहे. एर्नाकुलम-निजामुद्दिन एक्स्प्रेस आणि हिसार-कोईमतूर एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेसना नोव्हेंबर महिन्यापासून सिंधुदुर्ग व कणकवली स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या दोन थांब्यांमुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सोईस्कर होणार आहे.

या निर्णयानुसार एर्नाकुलम-निजामुद्दिन एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकात संध्याकाळी ७.०८ वा. दाखल होणार असून, ती ७.१० वा. मार्गस्थ होईल. या गाडीचा परतीचा प्रवासातील थांबा ७ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानुसार, सकाळी ७.२० वा. सिंधुदुर्गला पोहोचून ७.२२ वा. ती पुढे निघेल. दुसरीकडे, हिसार-कोईमतूर एक्स्प्रेस कणकवली स्थानकात रात्री ९.४६ वा. येईल आणि ९.४८ वा. पुढे निघेल. या गाडीच्या परतीच्या प्रवासात ८ नोव्हेंबरपासून सकाळी ६.३० वा. कणकवलीत थांबा मिळणार आहे.

Total Visitor Counter

3073151
Share This Article