GRAMIN SEARCH BANNER

‘पैसे वाटा आणि निवडणुका जिंका’ ही वृत्ती लोकशाहीसाठी घातक, गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांचे परखड मत

९० टक्के लोकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये मतदान का करायचे हेच माहित नसल्याचे खंडागळे यांचे निरीक्षण

रत्नागिरी: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालावर ‘गाव विकास समिती’चे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “घरोघरी जाऊन लग्नाची पत्रिका वाटल्याप्रमाणे पैसे वाटून निवडणुका जिंकल्या जात आहेत, ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वात मोठी शोकांतिका आहे,” अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले. याबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत खंडागळे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

निवडणुकीत पैशांचा बाजार, गावांच्या विकासाचा बाजार उठविणार

सुहास खंडागळे यांनी नमूद केले की, या निवडणुकीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. ज्यांच्या हातात आधी सत्ता होती, त्यांच्याच ताब्यात पुन्हा जिल्हा गेला आहे. मात्र, ‘घ्या पैसे आणि दाबा बटण’ ही जी नवी संस्कृती फोफावत आहे, ती लोकशाहीला पोखरत आहे. उमेदवारांनी केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आणि त्यानंतर पैसा कमवण्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबला असून, यात दुर्दैवाने मतदारही भ्रष्ट झाले आहेत.

मतदारांच्या अज्ञानाचा फायदा

व्हिडिओमध्ये त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणतात की, “जवळपास ९०% मतदारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नक्की कशासाठी आहेत, हेच माहिती नाही. या अज्ञानाचा फायदा राजकीय नेते उचलत आहेत.” जेव्हा मतदार आपल्या हक्कांच्या कामाऐवजी पैशाला महत्त्व देतो, तेव्हा खऱ्या अर्थाने गावचा विकास खुंटतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
*तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन*
सध्याच्या ‘बेरजेच्या राजकारणात’ सुशिक्षित तरुणही पैशांच्या जोरावर चालणाऱ्या या प्रक्रियेत सामील होत आहेत, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. जर ही परिस्थिती बदलायची असेल, तर समाजातील प्रामाणिक तरुणांनी पुढे येऊन ‘पैशांच्या राजकारणाला’ ठामपणे नकार दिला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत हीच स्थिती राहिली तर गावांचा विकास कठीण आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन

Total Visitor Counter

3485607
Share This Article