राजापूर : तालुक्यात सागवे कात्रादेवी गावात देवरुखकरवाडी येथे एका नव्या घराच्या कामासाठी ठेवलेल्या लोखंडी सेंटरींग प्लेट्स अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची घटना समोर आली. यामध्ये सुमारे ५६ हजार रुपयांचं नुकसान झाले. ही चोरी १५ जुलैच्या सायंकाळी ६ ते १६ जुलैच्या सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. यासंदर्भात सजल सुधाकर वास्कर (वय ३४, व्यवसाय सेंटरींग, रा. सागवे कात्रादेवी) यांनी नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.
सौरभ शरदचंद्र सुतार यांच्या घराचं सेंटरींगचं काम सुरु होतं. कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ११२ लोखंडी प्लेट्स त्यांनी घराजवळच ठेवलेल्या होत्या. कोणीतरी अज्ञात इसम त्या संमतीशिवाय चोरून नेल्या. या प्लेट्स २४ x ३ फूट लांब रुंद असून, त्यावर “SSV” असं इंग्रजीत लिहिलेलं होतं.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात तपास सुरू केला आहे.
राजापूर सागवे येथे नव्या घराच्या सेंटरींग प्लेट्स चोरीला; ५६ हजाराचे नुकसान
