GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: रत्नागिरी चर्मालयजवळ जोरदार राडा; गाडीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून जोरदार हाणामारी; पोलीस घटनास्थळी दाखल

Gramin Varta
1.7k Views

रत्नागिरी: चर्मालय परिसरातील मुख्य रस्त्यावर रिक्षा ओव्हरटेक केल्याच्या किरकोळ कारणावरून दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने रिक्षाला ओव्हरटेक केले, ज्याचा राग आल्याने रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, दुचाकीस्वाराने रिक्षा थांबवून चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

या वादाचे पडसाद उमटून दोन्ही बाजूने लोक जमा झाले आणि दोन गटांत जोरदार राडा सुरू झाला. बघता बघता घटनास्थळी मोठी गर्दी जमली, ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाढता जमाव पाहून लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या दोन्ही गटांतील व्यक्तींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, परस्परविरोधी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3344366
Share This Article