चिपळूण | तालुक्यातील कापसाळ मोरेवाडी परिसरात एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थ्यांची बस थांबलेली असताना ट्रेलरने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत बसवरील मदतनीस जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.४० वाजता घडला.
याप्रकरणी संग्राम विजय चव्हाण (वय ४८, रा. कोलेखाजन, चिपळूण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते शाळेच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बस (MH08/E/9201) घेऊन कापसाळ येथे थांबले होते. यावेळी मदतनीस संजय सखाराम खेडेकर (रा. कामथे माटेवाडी) हे मुलांना बसमध्ये बसवत होते. अचानक मुंबई बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रेलर (गाडी क्र. DD01/H/9153) ने पाठीमागून बसला जोरदार धडक दिली. या धडकेत संजय खेडेकर हे जखमी झाले. त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचारासाठी हालचाल करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपी चालक निलेश राणा (रा. घाटकोपर, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण कापसाळ येथे स्कूल बसला ट्रेलरची धडक; एक जखमी
