GRAMIN SEARCH BANNER

परशुराम घाटात कारला टँकरची धडक; टँकर चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
69 Views

चिपळूण : मुंबई–गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरात रविवारी कारला मागून टँकरची धडक बसून अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमजद अन्सारी (वय ४३, रा. झारखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टँकर चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पणवकुमार दिलीप पोतेकर (रा. ठाणे) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणवकुमार पोतेकर हे त्यांच्या ताब्यातील कारने परशुराम घाटातून प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या कारच्या मागून येणारा टँकर चालक अमजद अन्सारी याने बेदरकारपणे वाहन चालवत पोतेकर यांच्या कारला मागून सलग दोन वेळा धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे

Total Visitor Counter

3366871
Share This Article