दापोलीतील महिलेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

दापोली : तालुक्यातील भानघर माटवन येथील जयवंती बाळकृष्ण पवार (वय ७३) यांचा मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयवंती पवार यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी दापोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जयवंती पवार यांचे निधन झाले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *