GRAMIN SEARCH BANNER

दापोली : दारूच्या नशेत झोपलेल्या तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
24 Views

दापोली : तालुक्यातील ताडील–सुरेवाडी येथील समित शांताराम पवार (वय ४४) या तरुणाचा दापोली शहरात मृत्यू झाल्याची घटना ८ जानेवारी रोजी उघडकीस आली.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समित पवार हा दारूच्या नशेत दापोली बसस्थानक व परिसरात फिरत असे आणि दुकानदारांकडे पैसे मागत असे. मिळालेल्या पैशातून तो अन्न घेत असे व अनेकदा बसस्थानक परिसरातच झोप घेत असे. ७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो दारूच्या नशेत आझाद मैदान परिसरात गेला होता. तेथे त्याने पिवळ्या रंगाची ताडपत्री अंगावर घेऊन झोप घेतली होती.

८ जानेवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्याची पाहणी केली असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर समित पवार याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3369558
Share This Article