मुंबई : कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चार मनसे नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये दोन दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
बडतर्फ करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये वैभव खेडेकर (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे (चिपळूण, रत्नागिरी) आणि सुबोध जाधव (माणगाव, रायगड) यांचा समावेश आहे.
पक्षाच्या नियम व धोरणांचे उल्लंघन तसेच पक्षविरोधी कार्य केल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाची घोषणा मनसे नेते संदीप देशपांडे व अविनाश जाधव यांनी केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग : मनसेला कोकणात हादरा; वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर यांच्यासह चौघांची हकालपट्टी
