GRAMIN SEARCH BANNER

आजपासून बारावीची परीक्षा, 15.32 लाख विद्यार्थी बसणार

Gramin Varta
151 Views

पेपर सुरु झाल्यानंतर 10 मिनिटे पेपर वाचनासाठी वेळ

मुंबई: राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे.

अशातच आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने तातडीची पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, यंदा 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. 3387 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार असून यातील 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे, 3,80,692 विद्यार्थी हे कला शाखेचे, तर 3,20,152 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि आयटीआय टेक्निकल सायंन्सचेही काही विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

बेडसे यांनी म्हटले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही 3 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले. यंदा आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करणार आहेत. बोर्ड स्तरावरही 10 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. काही पेपर सकाळी 11 वाजता आणि काही पेपर दुपारी 3 वाजता असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याआधी 11 वाजता पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटांचा वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत होता. मात्र यंदा 11 वाजता पेपर सुरु झाल्यानंतर 10 मिनिटे पेपर वाचन करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे, परीक्षेच्या शेवटी हा वेळ जोडला जाणार आहे. हा यंदाच्या परीक्षेतील मोठा बदल असणार आहे. पेपर लीक होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना तासाला 20 मिनिटे लेखनिक देण्यात येणार आहेत. कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आलेली आहे.

Total Visitor Counter

3301482
Share This Article