GRAMIN SEARCH BANNER

जाकादेवी विद्यालयात योग दिन  कृतीयुक्त योगासनांनी  उत्साहात साजरा

जाकादेवी/ संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात २१ जून आंतरराष्ट्री योग दिवस प्रशालेतील क्रीडा शिक्षक संतोष सनगरे  आणि क्रीडा शिक्षक किशोर नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध  योग -प्रात्यक्षिकांद्वारे हा दिवस उत्साहात संपन्न झाला‌‌.

सदचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे व पर्यवेक्षक शाम महाकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी क्रीडाशिक्षक संतोष सनगरे यांनी योग दिनाचे महत्त्व आपल्या जीवनात किती अमूल्य आहे, हे सांगताना त्यांनी योगामुळे आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सक्षम बनतेच, एवढेच नाही तर योगामुळे आपले जीवन सुखकर आणि  आरोग्यदायी बनते,असे उद्गार काढून श्री. सनगरे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय बहुमोल मार्गदर्शन करून नियमित योगासने करण्याचे आवाहन केले.

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन व आशिया खंडातील सर्वात मोठा दिवस अशा दोन्ही दिनांचे महत्त्व प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी पटवून दिले. यावेळी उपस्थितांचे स्वागत क्रीडाशिक्षक किशोर नलवडे यांनी केले, सूत्रसंचलन संतोष पवार यांनी , तर आभार संतोष  सनगरे यांनी मानले. या योग दिनाच्या प्रात्यक्षिकांमध्ये  प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी  क्रीडाशिक्षिका सौ. मनिषा धोंगडे, ज्येष्ठ  शिक्षक केशव राठोड, सहाय्यक शिक्षक विशाल बारस्कर, शुभम सानप, संदेश सोनवडकर, अवधूत जाधव ,साहिल रहाटे तसेच विद्यार्थी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2474980
Share This Article