GRAMIN SEARCH BANNER

देवरुख: चूल पेटवताना आगीचा भडका उडून महिला भाजली

Gramin Varta
215 Views

रत्नागिरीः जेवण करण्यासाठी  असताना रॉकेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. अक्षदा संतोष अंकुशराव (वय ४७, रा. किरबेट साखरपा, ता. संगमेश्वर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१) सकाळी साडेसातच्या सुमारास किरबेट येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षदा अंकुशराव या सकाळी साडेसातच्या सुमारास चुलीवर जेवण बनवण्यासाठी चूल पेटवत होत्या. रॉकेल ओतून पेटवले असता आगीचा भडका उडून अंगावरील नायलॉनच्या साडीने पेट घेतला. यामध्ये त्या ६० टक्के भाजल्या. त्यांना प्रथम साखरपा आरोग्यकेंद्रात आणि नंतर रत्नागिरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

Total Visitor Counter

2645633
Share This Article