रत्नागिरी : गोळप–रनपार रस्त्यावरील रात्रीच्या शांत वातावरणात संशयास्पद हालचाल करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता पूर्णगड पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी सोबान हसन सारंग (वय ७८, रा. गोळप मोहल्ला, मुसलमानवाडी, रत्नागिरी) हे तोंडाला रुमाल बांधून रस्त्यावर फिरताना दिसले. त्यांच्या वागणुकीवर संशय आल्याने पोलिसांनी थांबवून विचारपूस केली. मात्र, समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोळप-रनपार मार्गावर संशयास्पद हालचाली करणाऱ्यावर गुन्हा
