वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत ₹1 कोटींचा निधी
संदिप घाग / सावर्डे
चिपळूण तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम वस्तीमध्ये राहणाऱ्या धनगर, भोई, गवळी समाजासाठी एक दिलासादायक बातमी. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश मिळत, वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत ₹1 कोटींचा निधी सौर ऊर्जा स्ट्रीट लाईटसाठी मंजूर करून मतदारांना मोठी भेट दिली आहे
*मौजे कोंडमळा धनगरवाडी, कोसबी धनगरवाडी, वेहेळे भोजनेवाडी, डेरवण धनगरवाडी, सावर्डे धनगरवाडी, पोफळी एनाचे तळे आणि करजवाडा 1 व 2, तळसर शेवरीचा दंड, कोळकेवाडी जांभरई/वाडसाडी, मालदोली भोईवाडी, भिले भोईवाडी या भागांतील नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते.* अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे म्हणजे धाडसाचं काम. रस्ते अंधारात भिती, महिलांना आणि वृद्धांना सुरक्षिततेची चिंता, तर वन्यप्राण्यांच्या उपस्थितीमुळे कायम असणारा जीवघेणा धोका ही परिस्थिती होती पण आता हे चित्र बदलणार आहे.
या सौर पथदीपांमुळे नागरिकांना रात्री अपरात्री सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे, वीज बिलाचा कोणताही खर्च होणार नाही, कारण पथदीप सौर उर्जेवर चालणारे आहेत, आणि वन्यप्राण्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासूनही मोठ्या प्रमाणात बचाव होणार आहे. यामुळे येथील ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.
चिपळूण तालुक्यातील दुर्गम वाड्यांत स्ट्रीट लाईट्सचा प्रकाश ; आमदार शेखर निकम यांची मतदाराना मोठी भेट
