संगमेश्वर : धामणी ब्राम्हणवाडी येथे एका ज्येष्ठाच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीची ‘ज्यूपिटर क्लासिक’ दुचाकी चोरून नेल्याची घटना २० ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादी रवींद्र महादेव गुरव (वय ६८, रा. धामणी ब्राम्हणवाडी, पेट्रोल पंपाजवळ, ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी गुरव यांची पत्नीच्या नावावर असलेली पिवळ्या रंगाची टीव्हीएस मोटार कंपनीची ‘ज्यूपिटर क्लासिक’ (क्र. एम.एच.०८ ए.एस.२२९४) ही दुचाकी १९/१०/२०२५ रोजी रात्री ११.०० ते दि. २०/१०/२०२५ रोजी पहाटे ०६.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराच्या अंगणाबाहेर चावी आणि आर.सी. बूकसह उभी करून ठेवली होती.
अज्ञात चोरट्याने गुरव यांच्या परवानगीशिवाय, लबाडीच्या इराद्याने ही दुचाकी चोरून नेली. या चोरीला गेलेल्या मालाची किंमत सुमारे ३०,०००/- रुपये इतकी आहे.
या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गु.आर.क्र. १२१/२०२५ दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.