मालगुंड : ग्रामपंचायतच्या नियोजनाखाली आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे आरोग्य निरीक्षक डॉ.परशुराम निवेंडकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना आयोडीनचे महत्त्व आणि त्याची कमतरता झाल्यास होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. निवेंडकर यांनी सांगितले की, शरीरातील आयोडीनची कमतरता झाल्यास गळगंड, मानसिक विकासात अडथळा, बालकांमध्ये बौद्धिक विकृती असे विकार होऊ शकतात. त्यामुळे रोजच्या आहारात आयोडीनयुक्त मीठाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
या कार्यक्रमात मालगुंड, भगवतीनगर, निवेंडी व गणपतीपुळे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच नागरिकांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.आले.या वेळी अंगणवाडी बिट मालगुंड चे वतीने पोषण सप्ताह साजरा करण्यात आला.
आयोडीन न्यूनता विकार कार्यक्रमांतर्गत मालगुंड येथे जनजागृती
