कुलूप तोडून लॅपटॉप-सीपीयू लंपास; 20 हजारांचा ऐवज गायब
रत्नागिरी : रत्नागिरीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात 13 ऑगस्टच्या रात्री चोरी झाल्याची घटना घडली. चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील लॅपटॉप आणि सीपीयू चोरून नेला.
या चोरीत एकूण 20,000 रुपयांचा माल लंपास झाला आहे. यात लेनोवो कंपनीचा 10,000 रुपयांचा लॅपटॉप आणि एचपी कंपनीचा 10,000 रुपयांचा सीपीयू (डेस्कटॉप) यांचा समावेश आहे.
शहर पोलिसांत या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत
रत्नागिरीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात चोरी!
