GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात हाणामारी करणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना पोलिसांची समज

Gramin Varta
476 Views

चिपळूण : सुसंस्कृत चिपळुणात ‘भाईगिरी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गट एकमेकास भिडल्याची घटना शुक्रवारी शहरातील डीबीजे महाविद्यालयासमोर घडली होती. फिल्मी स्टाईलने झालेल्या या मारहाणीचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप पसरला. याची दखल घेत पोलिसांनी त्या तरुणांना कडक शब्दात समज दिली आहे. दरम्यान, महाविद्यालयाच्या कँटीनमध्ये बसण्यावरुन या वादाला सुरुवात झाल्याची माहिती पुढे येत आहे.

मारामारी करणारे विद्यार्थी १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यातील एका गटातील विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना सर्वांसमोर जबरदस्तीने उठाबशा काढण्यासाठीचा दम दिला जात होता. त्यांच्यातील वाद विकोपाला जाताच एक-दोन विद्यार्थ्यांनी तीन-चार विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अगदी मुंबई-गोवा महामार्गावरच्या सर्व्हिस रोडलगत एकमेकांस लोळवून मारहाण करण्यात आली.

काही वेळानंतर हा वाद मिटल्यानंतर रविवारी त्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर आला. यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी याबाबत कडक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी याची दखल घेत मारहाणीचा व्हिडीओ ताब्यात घेतला.

Total Visitor Counter

3213568
Share This Article