प्रशांत पोवार / राजापूर
मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण ते वाटूळ या दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, हायवे लगतचे सरपंच, पोलीस पाटील, रिक्षाचालक तसेच वाहनचालक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन निवेदन सादर केले. हे निवेदन राजापूर पोलीस निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावर सतत मोकाट गुरांचा वावर सुरू असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे यावर तातडीने बंदोबस्त करावा, तसेच मोकाट सोडणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला.
महामार्गावर जीवघेणा प्रश्न बनलेले मोकाट गुरे थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे
खारेपाटण ते वाटूळ दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करा; पोलिस निरीक्षकांना निवेदन
