GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात चार वाघ आणि सहा ब्लॅक पॅंथर

Gramin Search
25 Views

विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांची माहिती

चिपळूण- जिल्ह्यातील जंगलात ४ नर जातीचे वाघ आहेत. त्यांचे अस्तित्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून दिसून आले आहे. तसेच ६ ब्लॅक पँथर, मोठ्या प्रमाणात वानर, माकड असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली.
वनविभाग चिपळूण-रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी व ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप, वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळेत प्रास्ताविक करताना त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, एकूण वन क्षेत्रापैकी ९९ टक्के क्षेत्र हे खासगी मालकीचे असून केवळ १ टक्का वनक्षेत्र वनविभागाकडे आहे. मात्र असे असले तरी सर्वच वनक्षेत्रात विविध प्राण्यांचे वास्तव्य आहे. खासगी क्षेत्रात ६ ब्लॅक पँथर, वानर, माकडांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे केले नमूद केले.

वनविभागाला काहीही करता येत नसून करायचे झाल्यास अनेक अडचणी येतात. जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चार वाघांचे अस्तित्व दिसून आले आहे, ही बाब महत्त्वाची आहे. याचबरोबर ६ ब्लॅक पँथर व मोठ्या प्रमाणात वानर, माकड दिसून येतात.

Total Visitor Counter

2648156
Share This Article