GRAMIN SEARCH BANNER

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामसेवक बंडगर निलंबित

Gramin Varta
79 Views

रत्नागिरी : तरुणीला लग्नाचे आमिष तिच्यावर दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी दोन दिवसांची पोलिस कोठडी आलेल्या सुनावण्यात खडीकोळवण ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीच्या मनाविरुद्ध तिचा गर्भपात केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या ग्रामसेवकाचे नाव हरिदास शिवाजी बंडगर (कवठेमहांकाळ, सांगली) असे आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार हरिदास आणि तिची ओळख एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर हरिदासने तिला लग्नाचे वचन दिले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. जेव्हा तिने लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा हरिदासने तिला विश्वासात घेऊन एका

खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने देवरुख पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरिदास बंडगर याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३७६ (बलात्कार) आणि ३१३ (मनाविरुद्ध गर्भपात करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

या प्रकरणाचा अहवाल संगमेश्वर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेला सादर केला. संबंधित ग्रामसेवकाला ४८ तासांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Total Visitor Counter

3367007
Share This Article