उपोषणास जवळजवळ ५९० जण उपस्थित राहण्याची शक्यता
रत्नागिरी : रत्नागिरीतील तथाकथित आरजू कंपनी घोटाळ्यामध्ये फसलेले ग्राहक १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याची माहिती दीपराज शिंदे यांनी दिली. गेले वर्षभर विविध प्रकारच्या मागण्यासाठी आरजू या कंपनीने फसलेले ग्राहक सतत पाठपुरावा करत आहेत.
ही केस ही वर्षभर चालू असून त्यातील ३ आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असून, मुख्य आरोपी अमन ऊर्फ अनि महादेव जाधव याला पकडून द्यावे, तसेच जे ग्राहक फसलेले आहेत त्यांना नुकसानभरपाई मिळावी या मुख्य मागणीसाठी विलास वामन सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीमधील फसलेले जवळ जवळ ५८७ ग्राहकांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.
१५ ऑगस्टच्या उपोषणावर ठाम असून प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तसेच शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करून हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय येथे करणार असल्याचे विलास सुर्वे आणि दीपराज शिंदे यांनी सांगितले.