रत्नागिरी : मारुती मंदिर ते साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या रोडवरील, लॉरेन्स अँड मेयो दुकानासमोरून एक ह्युंडाई एक्सेंट चारचाकी गाडी (एम.एच.०८/एजी/२१६६) चोरीला गेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना १० जुलै रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास घडली.
बशीर मुसा काझी (वय ५८, व्यवसाय व्यापार, रा. प्लॉट नं के १३, एस.आय.डी.सी. झाडगाव, ता.जि. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, पानवलकर कॉलनी आरोग्य मंदिर येथे त्यांची गाडी चावीसह उभी करून ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
चोरीस गेलेल्या या ह्युंडाई एक्सेंट गाडीची अंदाजित किंमत १,५०,०००/- रुपये इतकी आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
रत्नागिरी मारुती मंदिर परिसरातून कारची चोरी, दीड लाखांचे नुकसान
