GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी दैवज्ञ भवन येथे भरदिवसा घरफोडी: दीड लाखांचे दागिने लंपास

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नाचणे येथे भरदिवसा घरफोडी होऊन अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २६ हजार ७०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. नाचणे रोडवरील दैवज्ञ भवन जवळ असलेल्या घरात शुक्रवारी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास ही चोरी झाली.

याप्रकरणी घराचे मालक सचिन ज्ञानेश्वर टेकाळे (वय ४४, रा. श्रीयश ०१, रुम नं २०१, दैवज्ञ भवन जवळ, नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कडीसहित उचकटून घरात चोरट्याने कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने चोरून नेले. चोरट्यांनी लंपास केलेल्या ऐवजामध्ये ८० हजार रुपये किमतीचे २ तोळ्यांचे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीची ५.५०० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ४ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची दोन गळ्यातील पाने, ४ हजार ८०० रुपये किमतीचे १.४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, १२ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले रिंग, ४०० रुपये किमतीची १५० मिली वजनाची नाकातील सोन्याची फली, ३ हजार रुपये किमतीच्या ४० ग्रॅम वजनाच्या ३ चांदीच्या चैनी, १५०० रुपये किमतीचे १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजण आणि १ हजार रुपये किमतीच्या ९ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या ३ अंगठ्या यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या एकूण मालाची किंमत १ लाख २६ हजार ७०० रुपये इतकी आहे.

या घटनेची माहिती मिळताच, रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2475247
Share This Article