लांजा : येथील क्षत्रिय मराठा ग्रुप भैरी भवानी नवरात्र उत्सव कोट, लांजा यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त फुगडी स्पर्धा २०२५ उत्साहात पार पडली. एकूण ११ मंडळांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत खालील विजेत्यांनी चमक दाखवली –
महाकाली फुगडी मंडळ, कोलधे कुंभारवाडी – प्रथम क्रमांक
श्री सोमेश्वर टिपरी नृत्य, कोट जोशीवाडी – द्वितीय क्रमांक
महिषासूर झलक टिपरी नृत्य, नाखरे – तृतीय क्रमांक
श्री साईकृपा महिला बचत गट, चांदोर गोताडवाडी – विशेष पारितोषिक
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कोट गावासह पंचक्रोशीतील मित्रमंडळींनी सहकार्य केले. पंच म्हणून सुनील धुमक (उपळे), रविंद्र पाष्टे (कोट), संदीप आग्रे (कोट) व भाई कामत (लांजा) यांनी काम पाहिले.
नियोजनाची जबाबदारी हेमराज सुर्वे, प्रशांत सुर्वे आणि ऋतुविज सुर्वे यांनी सांभाळली, तर सर्व रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे हंसराज सुर्वे यांनी उपलब्ध करून दिली.
या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून कोट सरपंच सौ. निशीगंधा नेवाळकर, जि.प. सदस्य व शिवसेना जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, झाशीच्या राणींचे वंशज राजुशेठ नेवाळकर व गावकार प्रकाश घडशी उपस्थित होते.
पहिल्यांदाच कोट गावात आणि पंचक्रोशीत अशी फुगडी स्पर्धा होत असल्याने मान्यवरांनी सुर्वे बंधूंच्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार भैयाशेठ सामंत, उद्योजक ऋषीदादा पत्याणे, बंडुशेठ पत्याणे व किरण शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
लांजा : क्षत्रिय मराठा ग्रुपच्या भैरी भवानी नवरात्र उत्सवात महाकाली फुगडी मंडळ प्रथम
