GRAMIN SEARCH BANNER

फिट येऊन डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
183 Views

खेड : फिट येऊन डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या सुमारे ३० वर्षीय अज्ञात तरुणाचा रत्नागिरी येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाच्या डोक्यावर काळे-पांढरे केस असून कपाळावर व नाकावर खरचटल्याच्या खुणा आहेत. मानेच्या उजव्या बाजूस ‘स्टार’ आकाराचे गोंदण, उजव्या हाताच्या दंडावर गोंदण तसेच पोटावरही खरचटल्याची खूण आढळून आली आहे.

या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अस्मिता साळवी करत आहेत.

Total Visitor Counter

3369792
Share This Article