GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण खरवते येथे 1 लाखांच्या खैराच्या झाडांची चोरी; एकाविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
292 Views

चिपळूण : तालुक्यातील खरवते येथे सामायिक मालकीच्या जमिनीतून खैराची झाडे मुळासकट तोडून चोरून नेल्याची घटना ५ ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली. या प्रकरणी शुक्रवारी चिपळूण पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिरुद्ध चंद्रकांत घाग (रा. खरवते) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मंगेश कृष्णा घाग (वय ५७, रा. खरवते) यांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश घाग यांच्या सामायिक मालकीच्या जमिनीत अंदाजे २५ मण वजनाची, सुमारे १ लाख रुपये किमतीची आणि सुमारे १० वर्षे जुनी ४० खैराची झाडे होती. मात्र अनिरुद्ध घाग याने ही झाडे मुळासकट तोडून चोरून नेल्याने सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

झाडे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मंगेश घाग यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनिरुद्ध घाग याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3388314
Share This Article