तुषार पाचलकर/राजापूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचल पूर्व विभागाच्या वतीने रायपाटण येथील सुप्रसिद्ध श्री देव सोमनाथेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे, या सदिच्छेने हा दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी पाचल पूर्व विभागातील शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना पाचल विभाग प्रमुख श्री. विलास नारकर, जिल्हा महिला संघटक सौ. उल्का विश्वासराव, विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख श्री. अशोक सक्रे, विभागीय संघटक श्री. अनंत कोलते, ज्येष्ठ पत्रकार श्री. नारायण पांचाळ, मनसे राजापूर तालुका उपाध्यक्ष श्री. मंगेश नारकर, श्री. मंगेश पराडकर, श्री. गौतम पांगरीकर, झर्ये येथील माजी सरपंच श्री. जनार्दन विश्वासराव, श्री. सुरेश गुरव, ओणी उपविभाग प्रमुख श्री. नागेश बने, श्री. स्वप्निल रेडीज, आरगाव येथील श्री. दामोदर खामकर, पाचल उपविभाग प्रमुख श्री. प्रदीप चंदुरकर, श्री. सुरेश सावंत, श्री. केशव पवार, श्री. सुनील नारकर, श्री. मधुकर तावडे, श्री. गोपीनाथ गोसावी, श्री. विलास म्हादये, श्री. आनंद कानडे, श्री. सुनील नारकर, श्री. तेजस रोडे, श्री. विलास चाफले, श्री. सुहास गांगण, श्री. दीपक मालप, श्री. अशोक शेट्ये, श्री. सुरेश सावंत, श्री. शिवाजी गुरव, श्री. काशीनाथ पवार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याप्रती आदर आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.