रत्नागिरी: ५८ व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक युवा महोत्सव साठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीमध्ये
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्किट स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.
मनस्वी वारीक,गायत्री मांगले,आस्था खेडकर,मैथिली सावंत,प्रार्थना भंडारे,(सर्व बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे)मधुश्री वझे (संस्कृत विभाग )यांचा सहभाग होता.
लेखन आणि दिग्दर्शन मयूर साळवी यांनी केले आहे.
‘ गाठोडं ‘ हे मराठी स्कीट महिलांच्या आयुष्यात वेग वेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या वेग वेगळ्या प्रॉब्लेम्स वर आधारित आहे. हे स्कीट मंगळागौर च्या खेळांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक महिलेला एका आजीच्या गाठोड्याची म्हणजेच तिच्या मार्गदर्शनाची गरज असते. महिलांचं आयुष्य मांडण्याचा एक सुंदर प्रयत्न या स्कीट मधून केला आहे.प्रा.वेदांत सौंदलेकर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ मकरंद साकळकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई ,कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये ,वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सीमा कदम ,विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.