GRAMIN SEARCH BANNER

थायलंडमध्ये रत्नागिरीची नूपूर शेट्ये चमकली ‘World Cup of Cultural Olympiad’ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मान

Gramin Varta
217 Views

दिनेश अंब्रे / संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा उजळविणारी आणि कोकणाचा अभिमान वाढविणारी कामगिरी सूनिल नगर, रत्नागिरी येथील कन्या नूपूर निलेश शेट्ये हिने केली आहे. दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी थायलंडमधील पट्टाया येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘World Cup of Cultural Olympiad’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नूपूरने आपले नृत्यकौशल्य सादर करत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेतील अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आयोजित आंतरराष्ट्रीय कथक नृत्य स्पर्धा (सोलो यूथ कॅटेगरी) मध्ये नूपूरने अप्रतिम सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला. या कामगिरीबद्दल तिला ‘वर्ल्ड कप ट्रॉफी’ व ‘स्पेशल अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.

नूपूरच्या या यशामुळे तिचे पालक, गुरुजन आणि रत्नागिरीतील नागरिकांमध्ये अभिमानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुजीब रहिमुद्दीन खान (अध्यक्ष, संगमेश्वर तालुका पत्रकार संघ) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नूपूरचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

नूपूर निलेश शेट्ये हिच्या या जागतिक यशामुळे रत्नागिरी आणि कोकणातील सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून हा कोकणासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Total Visitor Counter

3366850
Share This Article