राजापूर / वार्ताहर
राजापूर शहरानजीकच्या शीळ गावच्या माजी सरपंच सुप्रिया पेडणेकर यांची कन्या प्रेरणा संजय पेडणेकर यांच्या “भगवती एंटरप्रायझेस” या नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ नुकताच राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.
जकातनाका ते जवाहर चौक या मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या शुभारंभ सोहळ्याला प्रकाश चव्हाण, सुप्रिया पेडणेकर, सरपंच अशोक दिलीप मठकर, संदीप मालपेकर, विनय गुरव (सेवानिवृत्त शिक्षक), अॅड. मिलिंद चव्हाण, नसिम मालिम, भाजपाचे अनिलकुमार करंगुटकर, संजय पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्राला भेट देत प्रेरणा पेडणेकर यांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
“भगवती एंटरप्रायझेस” या नागरी सुविधा केंद्रात नागरीकांच्या सोयीसाठी खरेदी खत, गहाण खत, साठे खत, मुख्यत्यारपत्र, सर्च रिपोर्ट, वारस तपास, हक्कसोडपत्र, बक्षीस पत्र, मराठी व इंग्रजी टायपिंग, झेरॉक्स, विविध दाखले, ऑनलाईन सातबारा, आठअ अशा अनेक सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.
या केंद्रामुळे शहर व परिसरातील नागरिकांना विविध नागरी कामांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार असून मोठी सोय निर्माण झाली आहे.
राजापुरातील भगवती एंटरप्रायझेस नागरी सुविधा केंद्राचा अॅड. जमीर खलिफे यांच्या हस्ते शुभारंभ






