रत्नागिरी : बांग्लादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ संविधान सन्मान मंच, रत्नागिरी यांच्या वतीने सोमवारी (२९ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता झालेल्या या आंदोलनात मंचचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून बांग्लादेशातील परिस्थितीबाबत केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात चंद्रकांत राऊळ, गजानन करमरकर, भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी शहर अध्यक्ष दादा ढेकणे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष व नगरसेविका वर्षा ढेकणे, राकेश नलावडे, शैलेश बेर्डे, भाई दळी, सायली बेर्डे, भक्ती दळी, निलेश आखाडे, नितीश भारद्वाज, सचिन रेमणे, सचिन नानिवडेकर, सुशील कदम, रंजन आगाशे, प्रभाकर खानविलकर, अशोक वाडेकर, संतोष सावंत, पाजक्ता रुमडे, बाबू सुर्वे, प्रसाद बाष्टे आदी उपस्थित होते.
बांग्लादेशातील हिंदू नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.






