परभणी: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना थेट आणि गंभीर इशारा दिला आहे.
29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी त्यांनी संवाद दौरा सुरू केला असून या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भाषणात अनेक गंभीर आरोप आणि विधान केली. परभणी जिल्ह्यातील विविध गावातील मराठा समाज बांधवांशी संवाद साधला त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा केली.
परभणी जिल्ह्यातील विविध गावांतील मराठा समाज बांधवांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा केली.आमचं आंदोलन हे शांततेत होणार आहे. फडणवीस यांनी जर तसं काही करण्याचा विचार केला तर महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहीलच, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मोठा त्रास सहन करावा लागेल, असा थेट इशारा त्यांनी दिला.
दंगल भडकवू नका, अन्यथा महाराष्ट्र कायमचा बंद राहील – मनोज जरांगे
