रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील मंगलोर एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या मालवण येथील एका तरुणाचा अकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. संजय गोपाळ कोळंबेकर (वय ४७, रा. मिऱ्याबांध, मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे मृत तरुणाचे नाव आहे.
संजय कोळंबेकर हा १८ ऑगस्ट रोजी मुंबई सीएसटीहून मंगलोर एक्सप्रेसने प्रवास करत होते. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सहप्रवाशांच्या लक्षात आले की, संजय यांच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नाहीये. त्यांनी तात्काळ ही बाब रेल्वे पोलिसांना कळवली.
माहिती मिळताच, रेल्वे पोलिसांनी संजय यांना तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती संजय यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.