GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणात तरुणाचा आकस्मिक मृत्यू

चिपळूण : शहरातील अमेय अपार्टमेंटमध्ये रविवारी दुपारी एका व्यक्तीचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीची ओळख नीलेश यशवंत भोसले (वय 44, रा. कापसाळ नवीन वसाहत) अशी झाली आहे. हेमंत यशवंत भोसले यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अमेय अपार्टमेंटमधील त्यांच्या सदनिकेत किचनमधील पंख्याला दोरीने गळफास लागल्याचे आढळले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Total Visitor Counter

3487550
Share This Article