GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: युवा तायक्वांडो रत्नागिरी खेळाडूंचे पदक आणि ब्लॅक बेल्ट वितरण

रत्नागिरी – राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत युवा मार्शलआर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी संलग्न रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन नेहरू युवा केंद्र रत्नागिरी(भारत सरकार) तायक्वांदो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचं पदक वितरण आणि ब्लॅकबेल्ट वितरण करण्यात आलं.

नुकत्याच झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना पदक देण्यात आली. हा कार्यक्रम श्री साई सेवा मित्र मंडळ नाचणे गोडाऊन स्टॉप रत्नागिरी येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीसाई सेवा मित्र मंडळ नाचणेचे अध्यक्ष श्री.  संतोष सावंत तसंच सौ.  सोनाली संदेश सावंत उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच बँक ऑफ बडोदा चे अधिकारी श्री. प्रशांत जाधव आरडीसीसी बँकेचे अधिकारी श्री तुषार साळुंखे, सौ सीमा धुळप,  हे मान्यवरही उपस्थित होते. प्रशिक्षक राम कररा  अमित जाधव  शशिरेखा कररा अथर्व भागवत गुरुप्रसाद सावंत  प्रतीक पवार तनवी साळुंखे यांनी सर्व मान्यवरांच स्वागत केलं.

दिनांक दोन ते चार ऑगस्ट 2025 रोजी स्वामी मंगल कार्यालय चिपळूण येथे घेण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद  क्योरुगी व पूमसे तायक्वांदो स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी या क्लबने एकूण 66 पदके संपादन करत पूमसे या प्रकारात प्रथम क्रमांकाचा चषक तर फ्रीस्टाइल पूमसे या प्रकारातही प्रथम क्रमांक चषक पटकावला होता. क्योरोगी आणि पुमसे या दोन्ही प्रकारात घवघवीत यश मिळवलेल्या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी जागतिक तायक्वांदो असोसिएशन आयोजित ब्लॅक बेल्ट फर्स्ट dan परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना ब्लॅकबेल्ट वितरण करण्यात आले.

क्रीडा व युवक सेवा संचालनायक महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित  शालेय तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे येथे झालेल्या सीबीएससी विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत यूपी येथे सहभागी होणाऱ्या दुर्वा संदीप पाटील आणि प्रशिक्षिका शशी रेखा कररा यांनाही यावेळी सन्मानित करत स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तनवी साळुंखे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरता प्रशिक्षक गुरुप्रसाद सावंत, श्रुती काळे, अमेय पाटील, भार्गवी पवार, योगराज पवार, तनिष्का जाधव, वेदांत देसाई यांनी परिश्रम घेतले.

Total Visitor Counter

2474914
Share This Article