चिपळूण : शहरातील गणेशोत्सवाचा उत्साह अधिक रंगतदार करण्यासाठी रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
फक्त स्पर्धा नाही… उत्सव आनंदाचा, संवाद स्नेहाचा या ब्रीदवाक्यासह होणारी ही स्पर्धा घराघरातील गणेशोत्सवाला सर्जनशीलतेची नवी झळाळी देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपल्या घरी गणपती किंवा गौरी-गणपती बसविल्याचा उल्लेख करून नाव, पत्ता व फोन नंबर व्हॉट्सअॅप क्रमांक ९६२३११०८२० या क्रमांकावर पाठवावा. परीक्षक स्पर्धकांच्या घरी भेट देऊन सजावटीचे परीक्षण करतील.
स्पर्धेतील प्रथम विजेत्याला चांदीची गणेश मूर्ती, द्वितीय क्रमांकाला चांदीची लक्ष्मी मूर्ती आणि तृतीय विजेत्याला चांदीचा त्रिशूल दिला जाईल. उत्तेजनार्थ तीन स्पर्धकांना चांदीचे मोदक दिले जातील. सर्व विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. प्रत्येक स्पर्धकास सन्मानपत्राने गौरविण्यात येईल.
स्पर्धेत सहभागासाठी २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. अधिकाधिक नागरिकांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रंजिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चिपळूणला गौरी-गणपती सजावट स्पर्धा
