लांजा : तालुक्यात गेली दोन दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या माचाळ गावाकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी मोठी दरड कोसळल्याने माचाळ गावाचा संपर्क तुटला होता.
माचाळ खिंड येथे तीव्र घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने माचाळ पर्यटन क्षेत्राकडे जाणारा रस्ता पूर्णतः ठप्प पडला होता. यामुळे माचाळ व लांजाकडे दोन्ही बाजूनी ये-जा करणारी वाहने घाटात अडकून पडली होती. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून लांजा तालुक्यात पाऊस पुन्हा जोरदार सुरू झाला आहे. ऐन गणेशोत्सवात पावसाने हजेरी लावली आहे. अशातच लांजा तालुक्यात शुक्रवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान माचाळ येथे दरड कोसळली. माचाळ-पालू खिंड येथे ही घटना घडली. दरड कोसळल्यामुळे माचाळ गावचा संपर्क तुटला होता.
पावसामुळे माचाळ मार्गावर दरड कोसळल्याने पर्यटक अडकले
