GRAMIN SEARCH BANNER

एक इंच जमीन घेतली तर मी आडवा उभा राहीन-सहदेव बेटकर

वाटद एमआयडीसी विरोधी आंदोलनाला शिवसेनेचा पाठींबा

रत्नागिरी : वाटद एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची एक इंच जरी जमीन घेतलात तर मी आडवा उभा राहीन.तुम्ही उद्योगमंत्री,पालकमंत्री असलात तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाचा डाव हाणून पाडू असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी दिला.ते आज वाटद एमआयडीसीच्या विरोधात आयोजित जनसंवाद सभेत बोलत होते.यावेळी वाटद एमआयडीसी विरोधातील आंदोलनाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर म्हणाले की,आंदोलनाचे नेते प्रथमेश गवाणकर माझ्या घरी दोन वेळा आले त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी विनंती केली म्हणून मी आज येथे आलो आहे.आता तुम्ही एकटे नाही आहात हा तुमच्या समाजाचा सहदेव बेटकर तुमच्या सोबत आहे.तुमची जमीन घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर मी आडवा उभा राहीन.हे उद्योगमंत्री आमच्या पक्षात होते तेव्हा वाटद एमआयडीसीबाबत त्यांची भूमिका वेगळी होती.आता मिंद्येगटात गेल्यावर त्यांची भूमिका कशी काय बदलली? असा सवाल बेटकर यांनी उपस्थित केला.

रामदास कदमांना बेटकरांचा इशारा

संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतला.रामदास कदम म्हणतात कुणबी समाजाचा माणूस विधानसभेत जाऊन नांगर धरणार काय? आम्ही नांगर विधानसभेत धरायचा की शेतात हे दाखवून देऊ असा इशारा सहदेव बेटकर यांनी दिला.

Total Visitor Counter

2455617
Share This Article