GRAMIN SEARCH BANNER

ठेकेदाराला मारहाण प्रकरणी एकास सोलापूरमधून अटक

Gramin Varta
156 Views

चिपळूण : येथील बायपास मार्गावर ठेकेदार अनिल मारुती चिले (वय ५८, रा. पाचाड) यांची कार अडवून तिघांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांपैकी एकाला चिपळूण पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली आहे. स्वप्नील युवराज बनसोडे (वय २५, रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
२८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. अटक केलेल्या आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

3073122
Share This Article