GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : रेल्वे कॉलनीतून दुचाकीची चोरी

Gramin Varta
144 Views

रत्नागिरी : शहरालगतच्या रेल्वे कॉलनी परिसरातील एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी शुक्रवार, ९ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी आसीफ उस्मान पिरनाईक (वय २१, रा. कालसेकर चाळ, लांजा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आसीफ पिरनाईक यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच ०८ यू ५८४२) रेल्वे कॉलनीतील संबंधित इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र काही वेळाने परत आल्यानंतर दुचाकी दिसून न आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitor Counter

3376135
Share This Article