GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये भंगार गोडावूनमधून ६४ हजार रुपयांचे ड्रम सिट चोरीला, दोघेजण रिक्षा टेम्पोसह ताब्यात!

Gramin Varta
115 Views

रत्नागिरी: खेड तालुक्यातून चोरीची घटना समोर आली असून, खेड पोलिसांनी या प्रकरणाचा २४ तासांच्या आत छडा लावत दोन आरोपींना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात मोठे यश मिळवले आहे. धामणदेवी येथील ओमेगाईन हॉटेलजवळील एका भंगार गोडावूनमधून तब्बल ६४ हजार रुपये किमतीचे एम.एस. पत्राचे ६४ ड्रम सिट चोरीला गेले होते. ही चोरीची घटना २९/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजल्यापासून ते ३०/०९/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या मुदतीत घडली. मिरजोळी येथील भंगार विक्रेता सादिक सलीम कुरेशी (वय-२९) यांच्या मालकीच्या गोडावूनमधून हा ऐवज लंपास करण्यात आला होता.
चोरी उघडकीस येताच, फिर्यादी सादिक कुरेशी यांनी तत्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली तपासादरम्यान, पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी मंदार श्याम हुमणे (रा. परशुराम, दुर्गेवाडी, ता. चिपळूण) आणि संकेत महाडिक (रा. पाली, ता. खेड) या दोघांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी हे चोरीचा माल (एम.एच ०८ बी सी ०३२२) या क्रमांकाच्या अॅपे रिक्षा टेम्पोतून चोरून नेत असताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण ६४,०००/- रुपये किमतीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खेड पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे भंगार व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सध्या सुरू आहे.

Total Visitor Counter

2646954
Share This Article