गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांचे मतदारांना आवाहन
देवरुख:- गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीचे नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार सचिन आपिष्टे यांना तेथील स्थानिक जनतेने निवडून द्यावे. गाव विकास समिती व आम आदमी पार्टीचे नगरसेवक नगरपंचायत सभागृहात गेले तर ते जनतेचा आवाज म्हणून काम करतील व लोकांच्या हिताचे व्हिजन राबवतील असा विश्वास गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी व्यक्त केला आहे.
गाव विकास समिती व आम आदमी पार्टीच्या वतीने युतीचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार मैदानात आहेत त्यांना निवडून दिल्यास जनतेला अपेक्षित असणारा विकास घडेल असे उदय गोताड यांनी म्हटले आहे. त्या प्रभागातील जनतेने सचिन आपिष्टे व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ दिक्षा रविंद्र खंडागळे यांना त्यांच्या प्रभागातून मताधिक्य द्यावे असे आवाहन गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केले आहे.
नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन आपिष्टे विजयी झाल्यास सामान्य जनतेचा आवाज सभागृहात जाईल





