GRAMIN SEARCH BANNER

लांजा: आठ वर्षांचा जलतरणपटू रेयांश खामकरचा बाल मराठी संमेलनात सत्कार

Gramin Varta
68 Views

लांजा: अवघ्या आठव्या वर्षी तीन किलोमीटर सागरी जलतरण यशस्वी करणाऱ्या रेयांश खामकर या बालजलतरणपटूचा बाल मराठी संमेलनात सत्कार करण्यात आला.

रेयांश दीपक खामकर हा आरगाव (ता.लांजा) येथील मूळचा रहिवासी असून तो सध्या ठाण्यात राहतो. त्याने अवघ्या आठव्या वर्षी त्याने तीन किलोमीटरची सागरी जलतरण स्पर्धा यशस्वी केली. त्यानिमित्ताने त्याला काल, दि. १७ मार्च नवी मुंबईत वाशी येथे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित बाल मराठी संमेलनात बाल क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्व. दि. बा. पाटील साने गुरुजी बालनगरीमध्ये हा समारंभ झाला. त्यावेळी मंचावर शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर, ज्येष्ठ क्रीडाविश्लेषक सुनंदन लेले, पत्रकार व अँकर विजय साळवी, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे उपस्थित होते. अभिनेत्री नीलम शिर्के यांनीही रेयांशचे कौतुक केले.

Total Visitor Counter

3198612
Share This Article