GRAMIN SEARCH BANNER

नगरसेवक केतन शेट्ये यांची सोनगिरी दर्ग्याला सदिच्छा भेट

Gramin Varta
37 Views

सामाजिक एकतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा दिला संदेश

संगमेश्वर: कोकण नगरचे नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांनी सोनगिरी येथील दर्ग्याला सदिच्छा भेट देऊन सामाजिक एकतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श संदेश दिला. सोनगिरी उर्साच्या पवित्र निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली असून, यावेळी त्यांनी दर्ग्यावर श्रद्धेची चादर अर्पण करून परिसरात शांतता आणि बंधुभाव कायम राहण्यासाठी प्रार्थना केली.

उर्साचे औचित्य साधून दर्गा समितीच्या वतीने केतन शेट्ये यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सुमधुर कव्वालीच्या माध्यमातून भक्ती आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम यावेळी पाहायला मिळाला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना शेट्ये यांनी सांगितले की, समाजात शांतता, एकोपा आणि एकमेकांच्या धर्माचा आदर करणे ही काळाची गरज आहे. अशा धार्मिक उत्सवांमुळे सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत होतो, असेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याला युवा नेते सुयश शेट्ये, अजीम कासू, जावेद परदेसी, इम्तियाज कापडी, रोहन वरेकर, कासम मनेर, गौसदीन कापडी, शाहिद परदेसी, सम्रन हाफसानी, मुद्दसर मनेर, आयुब कापडी, यासीन सांगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे कोकण नगर आणि सोनगिरी परिसरात सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ झाली असून, शेट्ये यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3366959
Share This Article