GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : जोशी पाळंद येथील वृद्ध महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी : शहरातील जोशी पाळंद परिसरातील लक्ष्मीप्रसाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अंजली गंगाधर लिंगायत (वय ७०) यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २० जुलै) सायंकाळी घडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अंजली लिंगायत यांना गेल्या चार वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्या उपचारासाठी मुंबई येथे नियमित जात होत्या. शनिवारी दुपारी त्यांची सून चंदा लिंगायत यांनी त्यांना थोडा थकवा जाणवत असल्यामुळे हॉलमध्ये विश्रांतीसाठी बसवले होते. ‘उठू नकोस, मी स्वयंपाक करून येते’ असे सांगून चंदा किचनमध्ये गेल्या.
दरम्यान, दुपारी १.४५ वाजता अंजलीबाई काय करत आहेत हे पाहण्यासाठी चंदा हॉलमध्ये गेल्या असता त्या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या डोक्याजवळ रक्त सांडलेले दिसत होते. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावले आणि डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांच्या मदतीने १०८ अँब्युलन्स बोलावून अंजली लिंगायत यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून सायंकाळी ४.४० वाजता मृत घोषित केले.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3376076
Share This Article