GRAMIN SEARCH BANNER

एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद

दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मासिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते.या यादीच्या आधारे बरेच लोक त्यांच्या बँकिंग कामकाजाचे नियोजन करतात. आता एप्रिल महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहतील. आरबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील महिन्यात चार रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवार व्यतिरिक्त, विविध ठिकाणी बँका आठ दिवस बंद राहतील. हो, ऑक्टोबरसाठी कोणतेही नियोजन करण्यापूर्वी तुम्ही RBI ची सुट्ट्यांची यादी तपासा नायतर परत जावं लागेल.
महिन्याची सुरुवात १ एप्रिल रोजी सुट्टीने होत आहे. वार्षिक खाते बंद करण्याच्या प्रक्रियेसाठी देशभरातील बँका बंद राहतील. या दिवशी कोणतेही ऑफलाइन बँकिंग व्यवहार शक्य होणार नाहीत. एप्रिल २०२६ मध्ये तुमच्या राज्यात किंवा परिसरात बँका केव्हा बंद राहतील, हे येथे जाणून घ्या…

‘या’ तारखांना इथल्या बँका राहतील बंद

1 एप्रिल नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात त्यामुळे बँका सर्वत्र बंद राहतील
2 एप्रिल पुण्य गुरुवार, केरळ याठिकाणी बँका बंद राहतील.
3 एप्रिल, गुड फ्रायडे, सर्वत्र बंद राहतील
5 एप्रिल, रविवार, सर्वत्र बंद राहतील
11 एप्रिल दुसरा शनिवार, सर्वत्र बंद राहतील
12 एप्रिल रविवार, सर्वत्र बंद राहतील
14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महाविशुव संक्रांति/बिजू/ बुइसू महोत्सव/तमिल नव वर्ष दिवस/बोहाग बिहू/चिराओबा/बैसाखी विविध सण असल्यामुळे देशात सर्वत्र बँका बंद राहतील.
15 एप्रिल बंगाली नववर्ष दिवस असल्यामुळे अगरतला, गुवाहाटी, ईटानगर, कोच्चि, कोलकाता, शिमला आणि तिरुवनंतपुरम याठिकाणी बँका बंद राहतील.
16 एप्रिल बोहाग बिहू यासाठी गुवाहाटी येथील बँका बंद राहतील.
19 एप्रिल रविवार सर्वत्र बंद राहतील
20 एप्रिल बसव जयंती/अक्षय तृतीया बेंगळुरु याठिकाणी बँका बंद राहतील.
21 एप्रिल गरिया पूजा आगरतळा याठिकाणी बँका बंद राहतील.
25 एप्रिल चौथा शनिवार सर्वत्र बंद राहतील
26 एप्रिल रविवार सर्वत्र बंद राहतील

ऑनलाइन बँकिंगद्वारे काम

बँकेच्या सुट्ट्या असूनही तुम्ही पैशांचे व्यवहार आणि इतर व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमचा वापर कु शकता. या सेवांवर बँकेच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही.

१० दिवस शेअर बाजारात व्यवहार नाही

एप्रिल २०२६ मध्ये, आठ शनिवार आणि रविवारसह १० दिवस शेअर बाजार बंद राहील. याव्यतिरिक्त, गुड फ्रायडे (३ एप्रिल) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे.

Total Visitor Counter

3483792
Share This Article