GRAMIN SEARCH BANNER

देवनगरी देवरुख पर्यटन विकास कक्ष सुरू करणार,नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. दिक्षा खंडागळे यांची  घोषणा

Gramin Varta
133 Views

स्वतंत्र कक्ष स्थापन झाल्यास स्वतंत्र निधी व मनुष्यबळ उपलब्ध होईल, पर्यटन वाढीतून स्थानिक अर्थकारणाला चालना मिळेल

देवरुख: गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. दिक्षा रविंद्र खंडागळे यांनी देवरूखला पर्यटन नकाशावर आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ‘पर्यटनातून रोजगाराची हमी’ या आश्वासनावर जोर देत, त्यांनी देवरुख नगरपंचायतीमार्फत ‘देवनगरी देवरुख पर्यटन विकास कक्ष’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीच्या उमेदवार असलेल्या सौ. दिक्षा खंडागळे यांनी सांगितले की, या विशेष कक्षाच्या माध्यमातून देवरुखमधील पर्यटन विकासासाठी स्वतंत्रपणे तरतूद केली जाईल. तसेच, अभ्यासू नागरिक आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन विकास कक्ष कामकाज पाहील.

पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्यामुळे पर्यटन विकासासाठी लागणारे विशेष मनुष्यबळ आणि नियोजन तत्काळ उपलब्ध होईल. देवरुख व परिसराचे नैसर्गिक आणि ऐतिहासिक वैभव ओळखून, या कक्षाद्वारे येथील पर्यटन क्षमता पूर्ण क्षमतेने विकसित करण्याचे सौ. दिक्षा खंडागळे यांचे उद्दिष्ट आहे.

सौ. दिक्षा रविंद्र खंडागळे या नगराध्यक्ष पदासाठी ‘झाडू’ या निशाणीवर  निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून,त्यांच्या या पर्यटन-आधारित विकास मॉडेलमुळे देवरुखच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Total Visitor Counter

3304021
Share This Article