प्रभानवल्ली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे पार पडला कार्यक्रम
लांजा : तालुक्यातील श्री संत गोरोबा काका कुंभार समाजाच्यावतीने दहावी, बारावी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या कुंभार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम सोमवार ११ ऑगस्ट रोजी प्रभानवल्ली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कुंभारवाडी येथे संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांकडून कुंभार समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. तसेच त्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना समाजातील तरुणाईने शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात प्रगती करावी यासाठी गुणगौरव सोहळा अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, यावेळी लांजा तालुका कुंभार समाजाचे माजी अध्यक्ष विजय सोळगावकर, विद्यमान लांजा तालुका अध्यक्ष संतोष तुळसणकर, लांजा युवा आघाडीचे अध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ये, युवा आघाडीचे खजिनदार अनिकेत कुंभार, सचिव अमोल कुंभार, प्रभानवल्लीचे गावकर अनंत म्हेतर तसेच सुरेश गिरकर, उमेश कुंभार, कृष्णा गिरकर, गजानन साळवी, मंगेश कुंभार, संजय साळवी, रोहीत ईस्वलकर, जितेंद्र कुंभार, सागर कुंभार, अनिकेत साळवी, साहिल साळवी, दिपक कोळंबेकर, रमेश कुंभार, सत्यवान कुंभार, विराज कुंभार, हरिश्चंद्र गिरकर, नितिन वडवलकर, संतोष जुवळे, मनोहर म्हेतर, वसंत नागम, सदानंद म्हेतर, अंकुश म्हेतर, मनोहर म्हेतर, जगन्नाथ जुवळे, रघुनाथ म्हेतर, पांडुरंग म्हेतर, बंडू लांजेकर, शांताराम लांजेकर, महादेव लांजेकर, बाबल्या नागम, आरती म्हेतर , सुगंधा वडवलकर, रेश्मा म्हेतर, निर्मला म्हेतर, पूजा म्हेतर, अनुष्का म्हेतर, सत्यवती म्हेतर, मनिषा म्हेतर, अर्चना गिरकर, सुलोचना नागम, प्रमिला नागम, सुरेश म्हेतर, दत्ताराम म्हेतर, महेश जवळे आदी कुंभार समाज बांधव उपस्थित होते.