GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या भक्ती पवारने NIPER, अहमदाबाद येथून पटकावली पीएच.डी. पदवी

कोकणातील पहिली ‘डॉक्टर ऑफ फार्मास्युटिक्स’

चिपळूण: चिपळूणच्या भूमीला अभिमानास्पद कामगिरीने पुन्हा एकदा नवा मान मिळाला आहे! येथील कन्या कु. भक्ती मानसी महेंद्र पवार हिने अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER) मधून फार्मास्युटिक्स या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करत ‘डॉक्टरेट’ हा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे, या नामवंत संस्थेतून पीएच.डी. पदवी मिळवणारी ती कोकणातील पहिलीच सुकन्या ठरली आहे, ज्यामुळे चिपळूणसह संपूर्ण कोकणाचे नाव उंचावले आहे.

भक्तीने आपले अथक परिश्रम, दुर्दम्य चिकाटी आणि ध्येयवादी वृत्तीच्या बळावर हे यशोशिखर गाठले आहे. तिची ही कामगिरी केवळ चिपळूणसाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, तिच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या दैदिप्यमान यशानिमित्त श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या वतीने विश्वस्त श्री. समीर शेट्ये यांनी कु. भक्ती पवार हिचा सन्मान करत तिचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच, तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत श्रींचा सन्मानपूर्वक प्रसाद प्रदान करण्यात आला.

या गौरवशाली प्रसंगी भक्तीचे वडील श्री. महेंद्र मारुती पवार, आई सौ. मानसी महेंद्र पवार यांच्यासह श्री. नितीन रामराव कदम, सौ. नेहा नितीन कदम, श्री. प्रभाकर अमृतराव सुर्वे, स्वाती दीपक वारे, श्री. दिगंबर प्रभाकर सुर्वे, सौ. दीप्ती दिगंबर सुर्वे, श्री. पराग सुरेश पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.कु. भक्तीचे हे यश आजच्या तरुणींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

2475127
Share This Article